सुदर्शन क्रिया, योगासने, प्राणायाम व ध्यानासह व्यावहारिक ज्ञानाचे मार्गदर्शन
कणकवली (प्रतिनिधी) : द आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने ‘हॅपिनेस प्रोग्राम विथ उमेशजी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम कुडाळ येथे ६ ते ११ ऑक्टोबर या कालावधीत सकाळी ६ ते ८.३० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात सुदर्शन क्रिया, योगासने, प्राणायाम, ध्यान (मेडिटेशन) तसेच व्यावहारिक ज्ञान (प्रॅक्टिकल विझडम) याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तणावमुक्त जीवन, सकारात्मकता वाढविणे, उत्साह वाढविणे, मानसिक स्वास्थ्य आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी उपयुक्त विविध तंत्रांचा यामध्ये समावेश आहे.
कार्यक्रमाचे आयोजन ओंकार डीलक्स हॉल, महामार्गाजवळ, कुडाळ, सिंधुदुर्ग येथे करण्यात आले आहे. इच्छुकांनी ऑनलाइन नोंदणी : aolt.in/1062848 करावी,किंवा संपर्क :
उमेश – 9657479866,कुपेश – 8007969105,निलेश – 9422632156,राखी – 9404944628 यांना संपर्क साधावा,असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.












