कणकवली (प्रतिनिधी) : ग्वाल्हेर मध्यप्रदेश येथे २३ ते २६ सप्टेंबर रोजी ऑल इंडिया कॅरम फेडरेशन आयोजित कुमार गट कॅरम राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेमध्ये कू. दीक्षा चव्हाण ही कुमार गटाचे कप्तानपद भूषविणार आहे. दीक्षा चव्हाण ही सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रथम वर्ष इलेक्ट्रिकल विभागात शिक्षण घेत आहे.
दीक्षा चव्हाण हीची या स्पर्धेसाठी झालेली निवड ही संस्थेसाठी कौतुकाची बाब असून त्याबद्दल संस्थेच्या अध्यक्षा निलमताई राणे, उपाध्यक्ष निलेशजी राणे, सचिव नितेशजी राणे, प्राचार्य डॉ. डि. एस. बाडकर , प्रशासकीय अधिकारी शांतेश रावराणे , स्पोर्ट्स इन्चार्ज प्रा. एकनाथ मांजरेकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले आहे व तिच्या पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.













