एस एस पी एम काँलेज आँफ इंजिनिअरींग मध्ये, ” ऍप्टीट्युड स्किल डेव्हलपमेंट ” या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळा संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : एस. एस. पी. एम. काँलेज आँफ इंजिनिअरींग कणकवली मध्ये दिनांक ३०/८/२०२४ ते ०१/०९/२०२४ रोजी ,ऍप्टीट्युड स्किल डेव्हलपमेंट या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी ऍपटेक सोलुशन्स कोल्हापूर चे नवनीत कुमार दत्ता सर कोल्हापूर यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच ३ दिवसीय कार्यशाळेमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध ऍप्टीट्युड स्किल डेव्हलपमेंट वर मार्गदर्शन करण्यात आले.

सदर कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमध्ये नोकरी साठी लागणाऱ्या स्किल व त्यासाठी पूर्वतयारी कशी करायची याबाबत बहुमूल्य मार्गदर्शन मिळाले. या ट्रेनिंग व कार्यशाळेचा चा फायदा महाविद्यालयातील कॉम्पुटर,इलेक्ट्रिकल ,मेकॅनिकल, मेकॅट्रॉनिक्स आणि कॉम्पुटर सायन्स इंजिनीअरिंग (AIML) शाखांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय तसेच प्रायव्हेट कंपनी मध्ये नोकरी मिळविण्यासाठी नक्कीच होईल. एस. एस. पी. एम. काँलेज आँफ इंजिनिअरींग मागील २५ वर्षांपासून संस्थापक सन्मा. नारायणराव राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षा सन्मा. निलमताई राणे, ऊपाध्यक्ष सन्मा. निलेशजी राणे, सचिव नितेशजी राणे यांच्या नेतृत्वाखाली समाजातील विविध स्तरावरील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण ऊपलब्ध करून देत आहे.

सदर कार्यशाळेसाठी कॉलेजचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.एकनाथ मांजरेकर तसेच प्रा. सोमनाथ मेलसागरे, प्रा. नितीन सावंत, प्रा. तुषार मालपेकर, प्रा. अजित गोसावी यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर, प्रशासकीय अधिकारी शांतेश रावराणे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

error: Content is protected !!