निस्पृह काम अन विश्वासाचा सन्मान ! — पारकर गुरुजी
फोंडाघाट (प्रतिनिधी) : नुकत्याच पार पडलेला ग्रामपंचायत सभेमध्ये महात्मा गांधी तंटा मुक्ती समिती फोंडाघाटच्या अध्यक्षपदी सलग तिसऱ्या वेळी सुंदर राजाराम पारकर गुरुजी यांची एकमताने निवड करण्यात आली. गेली बारा वर्षे-दोन टर्म पारकर गुरुजी यांनी सर्वांना विश्वासात घेत, सामंजस्याने तंटे- समस्या सोडवीत, कामकाज केल्याने त्यांना तिसऱ्यांदा हा बहुमान मिळाला. आपल्या कारकिर्दीत महसूल जमीन विषया व्यतिरिक्त त्यांनी हद्द निश्चिती, गुन्हेगारी, सामाजिक ,कौटुंबिक तंटे- समस्या यावर सहकार्याने तोडगा काढून त्यांची अंमलबजावणी केली. निवडीबद्दल पारकर गुरुजी यांचे सरपंच संजना आग्रे,उपसरपंच तन्वी मोदी,ग्रामपंचायत सदस्य यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. गुरुजींच्या निवडीने बालगोपाळ मंडळ, फोंडाघाट शिक्षक परिवार, मित्रमंडळी आणि नागरिकांकडून कौतुक होत आहे…












