प्रवासी संघातर्फे ४ सप्टेंबरला गणेशभक्त, प्रवाशांचे स्वागत

कणकवली (प्रतिनिधी) : तालुका प्रवासी संघ कणकवलीतर्फे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिवर्षाप्रमाणे कोकणात येणारे गणेशभक्त, चाकरमानी, प्रवासी, चालक व सुरक्षेची काळजी घेणारे पोलीस यांच्या स्वागत कार्यक्रमाचे आयोजन बुधवार, ४ सप्टेंबरला सकाळी ९ वा. येथील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे करण्यात आले आहे.

चाकरमान्यांचा सुरक्षित प्रवास व्हावा, व्यसनमुक्त प्रवास, परिसराची स्वच्छता अशा विविध उद्देशाने तालुका प्रवासी संघातर्फे गेली सात वर्षे या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. स्वागत कार्यक्रमास विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, विविध शासकीय अधिकारी उपस्थित राहणार असून नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रवासी संघाचे अध्यक्ष मनोहर पालयेकर, सचिव विलास चव्हाण, सल्लागार तथा ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!