सीएनजी पंपावर गॅस पुरवठा सुरळीत सुरू ठेवा

ह्यूमन राईट असोसिएशन चे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना निवेदन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कोकण विभागात विशेषत: सिंधुदुर्ग जिल्हयात गणेशोत्सव काळामध्ये वाहनांसाठी सीएनजी गॅसची फार मोठया प्रमाणात मागणी असते. या काळामध्ये वाहनांसाठी लागणारा सीएनजी गॅस पूरवठा अखंडित ठेवण्याची मागणी वाहन धारकांकडून केली जात आहे. कोकणातील गणेशोत्सव हा सर्वात मोठा सण आहे. मुंबईहून चाकरमानी मंडळी यासाठी कोकणात खाजगी वाहनाने दाखल होतात. त्यामुळे या काळात सीएनजी पंपावर मोठया प्रमाणात गॅसचा तुटवडा भासतो. सीएनजी गॅसचा पूरवठा सुरळीत राहत नाही. तो सुरळीत राहण्यासाठी आपल्या स्तरावरून पूरवठा विभागाकडून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.

तसेच सिंधुदुर्ग जिल्हयात मे महिना व गणेशोत्सव काळात रीक्षा चालकांना चांगला धंदा असतो.परंतु या काळात चार पैसे मिळविण्याचा सीझन असूनही सीएनजी पंपावर गॅसचा तूटवडा भासत असल्याने रीक्षा चालकांना मोठया प्रमाणात तोटा सहन करावा लागतो.सीएनजी गॅस संपल्यानंतर पुन्हा गॅस उपलब्ध होईपर्यंत चार पाच तास मोठया रांगेमध्ये रीक्षा चालकांना व खाजगी वाहनधारकांना थांबावे लागते.

त्यामुळे गणपतीला सणा सुदीला येणाऱ्या मुंबईकर चाकरमान्यांच्या आनंदावर विर्जण पडते व प्रवास सुखकर व वेळेवर होत नाही.याकरिता जिल्हयातील सर्व सीएनजी पंपांवर गॅसचा मुबलक व अखंडित पूरवठा होईल याची खबरदारी घ्यावी अशी मागणी हयुमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन व कोकण विभाग रीक्षा टॅक्सी महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे.

निवेदन देतेवेळी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे वैभववाडी तालुका उपाध्यक्ष प्रणव बांदिवडेकर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!