शिवप्रेमी शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी किल्ले विजयदुर्ग परिसराची स्वच्छता मोहीम राबवून वाढदिवस केला साजरा 

देवगड (प्रतिनिधी) : विजयदुर्ग किल्यावरती आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून उध्दव सेनेचे नेते अतुल रावराणे यांनी कार्यकर्त्यासमवेत स्वच्छता मोहिम राबवून अनोख्या पध्दतीने आपला वाढदिवस साजरा केला.

विजयदुर्ग किल्यावरती ग्रामसकटरने साफसफाई करुन स्वच्छता मोहिम राबविताना उध्दव सेनेचे नेते अतुल रावराणे,तालुका प्रमुख मिलिंद साटम,विभाग प्रमुख संदिप डोळकर,वैभववाडी माजी सभापती लक्ष्मण रावराणे,राजु तावडे,रमाकांत राणे,निनाद देशपांडे,अतुल आंबेरकर,माजी जिल्हा परिष्द सदस्या वर्षा पवार,हर्षा ठाकुर, सचिन खडपे,इक्बाल धोपावकर,मिलेश बांदकर,बाबु डोंगरे,संतोष मणचेकर,शिरगांव विभाग प्रमुख मंगेश फाटक,रामेश्वर सरपंच मिलेश मोंडे, राजेंद्र परुळेकर,बिर्जे,संदिप आंबेरकर आदी उपस्थित होते.

विजयदुर्ग किल्यावरती 10 ग्रासकटरने बहुतांश किल्याची साफसफाई करण्यात आली. किल्यामध्ये प्रचंड प्रमाणात गवत वाढलेले होते. हे गवत ग्रासकटरच्या सहाय्याने व शिवसैनिक व विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाच्या मदतीने साफ करण्यात आले. उध्दव सेनेचे नेते अतुल रावराणे हे बोलताना म्हणाले कि, पर्यटन एके पर्यटनाच्या माध्यमातून गोवा राज्याचा प्रचंड प्रमाणात विकास झाला आहे. गोवा पेक्षाहि सिंधुदुर्गामध्ये निसर्गसौदर्याने नटलेली पर्यटन व ऐतिहासिक स्थळे आहेत. विजयदुर्ग किल्याला देखील पर्यटन अनेक पर्यटक भेटी देत असतात. पर्यटन एके पर्यटनाच्या माध्यमातून सिंधुदुर्गाचा विकास झाला तर गोव्यापेक्षाही सिंधुदुर्गामध्ये पर्यटक येवू शकतात याच दृष्टीकोनातून आपण स्वच्छतेच्या माध्यमातून विजयदुर्ग किल्याचा विकास करण्यासाठी आपण प्रयत्न करुन या ठिकाणी जास्तीत जास्त पर्यटक येण्याच्या दृष्टीकोनातून आपण वाटचाल करणार आहोत. या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून आर्थीक् सुबकता निर्माण व्हावी हेच आपले मुख्य ध्येय असणार आहे. जय भवानी जय शिवाजी या घोषणेने विजयदुर्ग किल्यामध्ये शिवसैनिकांच्या व ग्रामसथांच्यावतीने घोषणा देत साफसफाई करण्यात आली यावेळी भवानी मंदिराचे दर्शन घेवून उध्दवसेनेचे नेते अतुल रावराणे यांनी श्रीफळ वाढवून व नतमस्तक होवून स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली. यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक व विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!