फूड फेस्टीव्हल, रंगवली प्रदर्शन, वेशभूषा आणि रेकॉर्ड डान्स स्पर्धेने कार्यक्रमाची रंगत वाढवली
“खारेपाटण जि. प. केंद्र शाळेचा आदर्श इतर शाळांनी घ्यावा” – संजय आंग्रे, शिवसेना उपनेते
खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं. १ या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व शालेय विद्यार्थी वार्षिक बक्षिस वितरण समारंभ नुकताच खारेपाटण केंद्र शाळेच्या भव्य पटांगणावर संपन्न झाला. या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे तसेच फूड फेस्टिवल कार्यक्रमाचे उद्घघाटन शिंदे शिवसेना पक्षाचे उपनेते संजय आंग्रे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.

या कार्यक्रमाला जि. प. चे माजी बांधकाम व वित्त सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार, नवनिर्वाचित जि. प. सदस्य प्राची ईसवलकर, पं. स. गुरुप्रसाद शिंदे, खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव, संदेश पटेल, खा. पं. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, खारेपाटण श्री देव कालभैरव दुर्गादेवी मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष मधुकर गुरव, दानशूर व्यक्तिमत्व अमोल तळगावकर, शिवसेना तालुका प्रमुख मंगेश गुरव, महेश कोळसुलकर, माजी सरपंच रमाकांत राऊत, ग्रामपंचायत सदस्य क्षितिजा धुमाळे, अस्ताली पवार, मनाली होणाळे, अण्णा तेली, विजय देसाई, खारेपाटण हायस्कूल मुख्याध्यापक संजय सानप, पर्यवेशक संतोष राऊत, रोटरी क्लब ऑफ खारेपाटण चे अध्यक्ष दयानंद कोकाटे, प्रा. आ. केंद्र खारेपाटणच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम, सुरेंद्र कोरगावकर, खारेपाटण केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्राप्ती कट्टी, उपाध्यक्ष प्रियंका गुरव, समिती सदय मंगेश ब्रम्हदंडे, शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी वार्षिक स्मेहसंमेलन कार्यकमानिमित आयोजित करण्यात आलेल्या रंगवली प्रदर्शनाचे उद्घघाटन पंचायत समिती सदस्य गुरुप्रसाद शिंदे यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले. तर फूड फेस्टिवल उद्घाटन माजी जि. प. बांधकाम वित्त सभापती रवींद्र जठार व विद्यमान जि. प. सदस्या प्राची ईसवलकर यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी शाळेच्या वतीने कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शिवसेना उपनेते संजय आंग्रे व नवनिर्वाचित जि. प. सदस्य प्राची ईसवलकर आणि पं. स. सदस्य गुरुप्रसाद शिंदे व उपस्थित सर्व मान्यवरांचा शाळेच्या अध्यक्षा प्राप्ती कट्टी व मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सलग दोन दिवस झालेल्या खारेपाटण जि. प. केंद्र शाळेच्या वार्षिक बक्षिस वितरण कार्यक्रमाला पं. स. सदस्य गुरुप्रसाद शिंदे यांसह केंद्र प्रमुख संजय पवार, विनायक जाधव व त्यांचे सहकारी शिक्षक उपस्थित होते. यांच्या शुभहस्ते शालेय विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. तर वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमा निमित्त शालेय व खुल्या गटासाठी आयोजित करण्यात आलेल्या रंगवली स्पर्धा, रेकॉर्ड डान्स स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा व फूड फेस्टिवल स्पर्धा यातील विजेत्या स्पर्धकांना रोख रकमेची विविध पारितोषिके व प्रशस्तीपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.
“सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही आपल्या जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील आदर्श शाळा असून येथील शिक्षक व येथील शाळा व्यवस्थापन समिती एकत्र मिळून मराठी शाळा प्रामाणिकपणे टिकविण्यासाठी करत असलेले प्रयत्न याचा राज्यातील येथील शाळांनी आदर्श घ्यावा असे भावपूर्ण उदगार शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांनी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना काढले “
“एक प्राथमिक शाळेचा शिक्षक मनात आणले तर शाळेचा कायापालट कसा करू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे खारेपाटण केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर होय. आपली शाळा हेच आपले कुटुंब हे ध्येय उराशी बाळगून श्रावणकर यांनी शाळेची केलेली प्रगती उल्लेखनीय असून राज्यातील टॉप मॉडेल स्कूल म्हणून खारेपाटण शाळेचे नाव घेतले जाते. याचा जिल्हावासीय म्हणून आम्हाला सार्थ अभिमान आहे.” असे यावेळी माजी जि. प. बांधकाम व वित्त सभापती रवींद्र जठार यांनी सांगितले.
यावेळी खारेपाटण हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सानप, शिवसेना तालुका प्रमुख मंगेश गुरव, जि. प. सदस्य प्राची ईसवलकर, पं. स. सदस्य गुरुप्रसाद शिंदे यांनी देखील आपली मनोगते व्यक्त केली. तर शाळेच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने प्रदीप श्रावणकर यांचा सपत्नीक विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलागुण दर्शनाच्या कार्यक्रमाने रसिक प्रेषक भारावून गेले. तर प्रदीप श्रावणकर व त्यांच्या टीमने एवढ्या भव्य दिव्य आणि नीटनेटक्या कार्यक्रमाचे सुंदर आयोजन केल्याबद्दल ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक राजेश कदम यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक खारेपाटण केंद्र शाळेचे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर यांनी केले. तर आभार शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व शाळेच्या पालकांचे विशेष सहकार्य लाभले.













