न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट येथे ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ उत्साहात साजरा
फोंडाघाट (प्रतिनिधी) : न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित विविध स्पर्धांतून विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकता आणि वक्तृत्वाचे दर्शन घडवले. कार्यक्रमाचे उद्घाटन आणि स्वागत कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि थोर भारतीय शास्त्रज्ञ सर सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विद्यालयाच्या विज्ञान शिक्षिका यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मुख्या. प्रसाद पारकर, प्रा. वाळवे, प्रा. जठार, प्रा. डिसोजा आणि कदम उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ विज्ञान शिक्षिका दिशा पेडणेकर यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात विज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करत, वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचे आवाहन केले. विज्ञानाप्रती रुची निर्माण व्हावी यासाठी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा तीन गटांमध्ये वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे :-
१. वक्तृत्व स्पर्धा निकाल :
प्राथमिक गट : प्रथम – अर्णव भिसे, द्वितीय – निया एकावडे, तृतीय – धीरज राणे, उत्तेजनार्थ : स्वरा चव्हाण
माध्यमिक गट : प्रथम – पूजा हुंबे, द्वितीय – लावण्या भिसे, तृतीय – निकिता घाडी, उत्तेजनार्थ : वेदिका लाड
उच्च माध्यमिक गट : प्रथम – दिक्षा नानचे, द्वितीय – खुशी सावंत, तृतीय – सानिका सावंत, उत्तेजनार्थ : मानसी सावंत
२. चित्रकला स्पर्धा निकाल :
प्राथमिक गट : प्रथम – अर्णव भिसे, द्वितीय – समर्थ चव्हाण, तृतीय – ओम गोसावी, उत्तेजनार्थ : रवी सावंत
माध्यमिक गट : प्रथम – कादंबरी तायशेटे, द्वितीय – दिक्षा नानचे, तृतीय – विनायक मोहिते, उत्तेजनार्थ : निकिता घाडी
मुख्या. प्रसाद पारकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आणि शालेय स्तरावरील अशा उपक्रमांमुळेच उद्याचे शास्त्रज्ञ घडतील असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमाला शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अतिशय नेटके सूत्रसंचालन विद्यार्थिनी हर्षिका बोबकर हिने केले.












