जि. प. सदस्य संतोष पारकर यांच्या हस्ते कोळोशी चर्मकारवाडी रस्त्याचे भूमिपूजन

देवगड (प्रतिनिधी) : शासनाच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कोळोशी विठ्ठल मंदिर ते गावठणवाडी मार्गे चर्मकारवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे या कामाचा भूमिपूजन सोहळा जिल्हा परिषद सदस्य संतोष पारकर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला. या निमित्ताने पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके, भाजपाचे तालुका सरचिटणीस व कणकवली खरेदी विक्री संघाचे संचालक पंढरी वायंगणकर, सरपंच गुरुनाथ आचरेकर, उपसरपंच अतुल गुरव, ग्रामपंचायत सदस्य व शक्तीकेंद्र प्रमुख सुशील इंदप, सुचिता पोकळे, मीनाक्षी जाधव, ग्रामपंचायत अधिकारी मंगेश राणे, आप्पा इंदप, विद्याधर खोत, चंद्रकांत इंदप, सुभाष इंदप, मंगेश इंदप, शैलेश इंदप, विजय इंदप, संजय उर्फ भाऊ इंदप, प्रकाश गुरव, दत्तगुरु चव्हाण, विजय पां. इंदप, प्रताप इंदप, विकास इंदप, मोहन इंदप, सुभाष पां. इंदप, अनंत शेलार, उत्तम सावंत, संतोष तावडे, मनोहर चव्हाण तसेच मोठ्या प्रमाणावर वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बऱ्याच काळापासून मागणी असलेले काम मंजूर केल्याबद्दल पालकमंत्री नामदार नितेश राणे यांचे आभार मानून ग्रामस्थानी समाधान मानले.

error: Content is protected !!