मालवण तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षकांचा ५ मार्चला स्नेहमेळावा

मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन शाखा मालवणचा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक, पदवीधर, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी यांचा वार्षिक स्नेहमेळावा तालुकाध्यक्ष विजय चौकेकर यांचे अध्यक्षतेखाली जानकी मंगल कार्यालय कुंभारमाठ जरीमरी येथे गुरुवार दि. ५ मार्च सकाळी १० वा. होणार आहे. या कार्यक्रमात चालू शैक्षणिक वर्षात सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच ७५ वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला जिल्हा अध्यक्ष सावळाराम अणावकर, उपाध्यक्ष नारायण सावंत, भरत आवळे तसेच प्रकाश दळवी, जिल्हा सरचिटणीस सुंदर पारकर तसेच मालवण तालुका तहसिलदार गणेश लव्हे, गटविकास अधिकारी शाम चव्हाण, गटशिक्षणाधिकारी संजय माने, पोलिस निरीक्षक मालवण मारुती जगताप आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. मालवण तालुक्यातील सर्व सेवानिवृत्त शिक्षकानी वेळीच उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष विजय चौकेकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!