सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळामार्फत सिंधुदुर्ग जिल्हयातील भटक्या जमाती- क याप्रवर्गासाठी धनगर व तत्सम जमाती मधील लाभार्थीसाठी राज्यस्तरीय योजनेंअतर्गत भूमिहीन मेंढपाळ कुटुंबासाठी अर्धबंदिस्त, बंदिस्त मेंढीपालन करण्याकरीता जागा खरेदीसाठी अनुदान स्वरुपात एकवेळचे एकरकमी अर्थसहाय योजनेकरीता लाभार्थीनी www.mahamesh.org या संकेतस्थळावर 26 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. जे.एन. खरे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील भटक्या जमाती- क या प्रवर्गासाठी धनगर व तत्सम जमाती मधील लाभार्थींनीसाठी राज्यस्तरीय योजने अंतर्गत भूमिहीन मेंढपाळ कुटुंबासाठी अर्धबंदिस्त, बंदिस्त मेंढीपालन करण्याकरिता किमान 1 गुठा जागा खरेदी करण्यासाठी, जागेच्या किमतीच्या 75 टक्के अथवा किमान तीस वर्षासाठी भाडे करारावर घेण्यासाठी भाड्यापोटी द्यावयाच्या रकमेच्या 75 टक्के रक्कम एक वेळचे एक रकमी अर्थसहाय म्हणून कमाल रुपये 50,000/- एवेढे अनुदान वाटप करण्यात येते.
अधिक माहितीसाठी पशुधन विकास अधिकारी विस्तार संबंधित पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, जिल्हा सिंधुदुर्ग येथे संपर्क करावा.












