चराई अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळामार्फत जिल्ह्यातील भटक्या जमाती – क या प्रवर्गासाठी धनगर व तत्सम जमाती मधील मेंढपाळ कुटुंबांना राज्यस्तरीय योजनेअंतर्गत माहे जुन ते सप्टेंबर या चार महिन्यासाठी चराई अनुदान योजनेची योजनेंसाठी 26 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. जे.एन. खरे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील भटक्या जमाती क या प्रवर्गासाठी धनगर व तत्सम जमाती मधील मेंढपाळ कुटुंबांना ज्या मेंढपाळ कुटुंबाकडे किमान 20 मेंढ्या व 1 नर मेंढा एवढे पशुधन असणाऱ्या कुटुंबांना माहे जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीसाठी प्रतीमहा रुपये 6000, असे एकूण रुपये 24000, चराई अनुदान वाटप करण्यात येते. इच्छुक लाभार्थीनी www.mahamesh.org या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज 26 सप्टेंबर 2024 पर्यंत करता येणार आहे.
अधिक माहितीसाठी पशुधन विकास अधिकारी विस्तार संबंधित पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, जिल्हा सिंधुदुर्ग येथे सपंर्क करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!