सावंतवाडी (प्रतिनिधी) : केसरकर आतापर्यंत तीन वेळा या मतदारसंघाचे आमदार झाले तीन वेळा पक्ष बदलून मंत्री पद मिळवली मात्र त्यांचा पदांचा उपयोग या जिल्ह्याला काही झाला नाही असा टोला माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे लगावला. दरम्यान आंबोली कबुलायतदार गावकर प्रश्न गेले अनेक वर्ष प्रलंबित आहेत मात्र मंत्रीपद भूषण देखील तो प्रश्न केसरकर सोडू शकला नाही हे त्यांचे अपयश आहे असा टिका देखील त्यांनी यावेळी केली. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान ते पुढे म्हणाले केसरकर आता आपण तरुणांना जर्मनीत नोकऱ्या देणार अशा घोषणा करतात परंतु गेले पंधरा वर्षे ते या मतदारसंघात आमदार असून एकही बेरोजगारांना ते रोजगार उपलब्ध करून देऊ शकले नाहीत ते जर्मनीला काय रोजगार देणार असा सवाल उपरकर यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचे जे कोणी उमेदवार असतील त्यांच्या विरोधात आपण जिल्हाभर प्रचार करणार असल्याचा देखील उपरकर यांनी यावेळी सांगितलं. तसेच उपरकर पुढे म्हणाले दुसऱ्यांना लँड माफिया म्हणणारे राजकीय नेते हे स्वतः ही लँडमाफियाच आहेत असाही आरोप उपरकर यांनी यावेळी केला आहे. यावेळी आशिष सुभेदार यावेळी उपस्थित होते.