भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !

आचरा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार. रविंद्र चव्हाण यांचा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्ह्या सह राज्य भरात मोठया उत्साहात साजरा केला जात आहे. भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी आज नामदार रविंद्र चव्हाण यांची डोंबिवली पलाटा सिटी येथील निवास्थानी भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजप मालवण तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, भाजप मालवण शहर प्रभारी संतोष गांवकर, चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे, चिंदर सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!