सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी घेतले पंकज अदम यांच्या घरी गणरायाचे दर्शन

देवगड (प्रतिनिधी) : सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी नुकतीच जामसंडे भटवाडी येथील पंकज अदम यांच्याघरी भेट देवून त्यांच्या घरी विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी अदम कुटुंबियांकडून त्यांना महालक्ष्मीची प्रतिकृती भेटवस्तू म्हणून देण्यात आली. सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले हे देवगड दौऱ्यावरती आले असता त्यांनी देवगड येथील किल्याची पाहणी करुन गणपती मंदिराचे दर्शन घेतले. तसेच कुणकेश्वर मंदिरामध्ये जावून दर्शन घेवून मंदिराची पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत पंकज अदम, उत्तम बिर्जे,विकी अदम आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!