पडेल मंडळ आयोजित रक्तदान शिबिरात 57 रक्तदात्यांनी केले रक्तदान
देवगड (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस भाजपा पडेल मंडल च्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करून साजरा करण्यात आला. आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा तालुकाध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर यांच्या नियोजनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र पडेल येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण 57 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना माजी आमदार अजित गोगटे, तालुकाध्यक्ष बंड्या नारकर, तालुका प्रभारी डॉ अमोल तेली यांच्या हस्ते रक्तदान प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यावेळी माजी आमदार अजित गोगटे, जिल्हा उपाध्यक्ष बाळा खडपे, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, मंडल अध्यक्ष बंड्या नारकर, राजेंद्र शेटये, मंडल प्रभारी अमोल तेली, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष उत्तम बिर्जे पडेल सरपंच भूषण पोकळे उपसरपंच विश्वनाथ पडेलकर महिला मोर्चा अध्यक्ष संजना आळवे जिल्हा कार्यकारणी सदस्य आरिफ बगदादी, सदाशिव ओगले, योगेश पाटणकर, बापू जुवाटकर, बाबू आडीवरेकर, बांबुळकर, चव्हाण, आदिती तानवडे आदी उपस्थित होते.