वैभववाडीत उद्या भाजपाची लाभार्थी सन्मान यात्रा 

लाभार्थ्यांना विविध योजनांची मिळणार परिपूर्ण माहिती 

नागरिकांनी संधीचा लाभ घ्यावा : तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे यांचे आवाहन 

वैभववाडी (प्रतिनिधी): राज्यात महायुती व केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. या योजनांची माहिती व जनजागृती अधिक गतीने व्हावी यासाठी भाजपाच्या वतीने सोमवार दि. २३ सप्टेंबर रोजी लाभार्थी सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. वैभववाडी पोलीस ठाण्यानजीक इनामदार प्लाझा येथील भव्य पटांगणावर विविध योजनांच्या माहितीचे २० स्टॉल उभारण्यात येणार आहेत. या यात्रेत ज्येष्ठ नागरिकांसाठी मनोरंजनाचे स्टाॅल ही उभारले जाणार आहेत.

या यात्रेत पीएम किसान, लाडकी बहीण, वयोश्री, महिला सक्षमीकरण, एसटी सवलत, कृषी योजना, विज बिल माफ, घरेलू कामगार, बांधकाम कामगार योजना, तीर्थ दर्शन आधार कार्ड अपडेट वोटिंग कार्ड अपडेट वरील योजनेचे कोणाचे नवीन फॉर्म भरायचे असतील किंवा काही अडचणी असतील  अशा विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांना दिली जाणार आहे. व जनजागृती करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणीचे निरसन या यात्रेत केले जाणार आहे. तरी वैभववाडीतील लाभार्थ्यांनी या यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन वैभववाडी भाजपा अध्यक्ष सुधीर नकाशे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!