जिल्हा रुग्णालय कुडाळमध्ये करा

कुडाळ विकास समितीच्या बैठकीत एकमुखी मागणी

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ ग्रामीण रुग्णालयाच्या जागेमध्ये जिल्हा रुग्णालय झालेच पाहिजे या मागणीसाठी वेळ प्रसंगी उपोषण, आमरण उपोषण आंदोलन करू असा इशारा आजच्या कुडाळ विकास समितीच्या बैठकीत एकमुखी घेण्यात आला. याबाबत उद्या सोमवार २३ सप्सटेंबर रोजी सकाळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून कुडाळची ओळख आहे या ठिकाणी कुडाळ ग्रामीण रुग्णालय कार्यान्वित आहे या ठिकाणी जिल्हा रुग्णालय झाले पाहिजे या मागणीसाठी कुडाळ विकास समितीने पावले टाकली आहेत जिल्हा रुग्णालय होण्यासंदर्भात आज सायंकाळी मारुती मंदिराच्या धर्म शाळेत बैठक झाली. यावेळी काका कुडाळकर, सुनील भोगटे, अभय शिरसाट, उपनगराध्यक्ष किरण शिंदे धीरज परब, ओंकार तेली, प्रसाद शिरसाट, मंदार शिरसाट, ऍड. सुहास सावंत, द्वारकानाथ घुर्ये, सीए. सागर तेली, सचिन काळप प्रसाद शिरसाट श्रीराम शिरसाट, संजय भोगटे, संदेश पडते, मनोहर कामत, दादा पडते, रत्नाकर प्रभूतेंडोलकर, द्वारकानाथ घुर्ये, अजय शिरसाट, राकेश वर्दम, अमेय शिरसाट, राजन काळप, चेतन धुरी, ओंकार साळवी, उमेश परब, प्रकाश कुंटे, भाऊ राऊळ, योगेश राऊळ, रविंद्र राऊळ, लक्ष्मण राऊळ आदी उपस्थित होते. बैठकीत झालेल्या चर्चेनुसार उद्या सोमवारी सकाळी ११ वाजता तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे त्यानंतर मंगळवारी सायंकाळी तीन वाजता जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात येणार तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच आमदार खासदार यांची भेट घेऊन दरम्यानच्या कालावधीत त्यांना निवेदन देण्याचे ठरले निवेदन किवा चर्चा यातून काहीच निष्पन्न न झाल्यास ३० सप्टेंबरला लाक्षणिक उपोषण त्यातूनही ठोस निर्णय न मिळाल्यास ७ ऑक्टोबरला आमरण उपोषण करण्याचा इशारा कुडाळ विकास समितीने दिला आहे त्यानंतरची पुढील भूमिका ठरविली जाईल मात्र कुडाळ येथे जिल्हा रुग्णालय झालेच पाहिजे ही आमची आग्रही मागणी असणार असल्याचे कुडाळ विकास समितीच्या पदाधिकाऱ्यानी सांगितले जिल्हा रुग्णालय होण्यासाठी श्री देव मारुतीला गा-हाणे घालण्यात आले.

खासदार नारायण राणे यांना निवेदन देणार

सिंधुदुर्ग जिल्हयाचे जिल्हा रुग्णालय ओरोस येथे कार्यान्वित होते. परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा रुग्णालय येथे कार्यान्वित झाल्याने जिल्हा रुग्णालय पूर्णपणे बंद अवस्थेत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकांचे, रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. कुडाळ शहर हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती आहे. शहरातून राष्ट्रीय महामार्ग, रेल्वेस्टेशन व जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना मध्यवर्ती असे ठिकाण आहे व अनेक खाजगी हॉस्पिटल कुडाळ येथे आहेत. इमर्जन्सी वेळेला खाजगी हॉस्पिटलमधील डॉक्टर सुविधा देऊ शकतात. यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना कुडाळ शहरात जिल्हा रुग्णालय झाले तर फायदा होऊ शकतो कुडाळ ग्रामीण रुग्णालय इमारत जीर्ण झाली आहे. ही इमारत निर्लेखित होऊ शकते. कुडाळ ग्रामीण रुग्णालय ज्या ठिकाणी कार्यान्वित आहे ती जागा जवळजवळ ६० गुंठे आहे. या ठिकाणी प्रशस्त जिल्हा रुग्णालयाची इमारत होऊ शकते. तसेच जुना जिल्हाधिकारी बंगला व ग्रामीण रुग्णालय कर्मचाऱ्यांची वसाहत ही जागा आरोग्य विभागाची आहे. येथे जिल्हा रुग्णालय डॉक्टर व कर्मचाऱ्यांची वसाहत होऊ शकते. या सर्व बाबींचा विचार करून जिल्हा रुग्णालय कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे प्रशस्त इमारत होऊन कार्यान्वित करावे असे निवेदन खासदार नारायण राणे यांना देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!