सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी मंडळ आयोजित परीक्षेत खारेपाटण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे सुयश

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या कै.विजयकुमार माळगांवकर सर स्मृती मानकवर्तनी हिंदी परीक्षेमध्ये खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलितल शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालयातील विद्यार्थी कुमार आयुष प्रशांत मांगले व अवधूत गोखले या विध्यार्थ्यांनी कणकवली तालुक्यात अनुक्रमे प्रथम व तृतीय क्रमांक पटकावला आहे.त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

कै. विजय माळगावकर सर हे खारेपाटण हायस्कूल मध्ये हिंदी विषयाचे गाढे अभ्यासक व शिक्षक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी दरवर्षी हिंदी मंडळामार्फत सदर परीक्षेचे आयोजन करण्यात येते. त्यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या हिंदी परीक्षेत खारेपाटण हायस्कूल मधील विद्यार्थी आयुष प्रशांत मांगले व अवधूत गोखले यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला. या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक संजय सानप,संस्थाचालक विजय देसाई व पर्यवेक्षक संतोष राऊत यांच्या हस्ते प्रमाणपत्र व रोख रक्कमेचा धनादेश प्रदान करून सत्कार व अभिनंदन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक विजय देसाई, शाळेचे शिक्षक रामदास कापसे, लक्ष्मीकांत हरयान, नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केलेल्या विध्यार्थ्यांचे देखील यावेळी पुष्पगुच्छ देऊन शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!