युवा परिवर्तन प्रतिष्ठान-लोरे चे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते चंदू रावराणे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

गेली 10 वर्षे राबवतात रक्तदान शिबीर

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्ववलन करून रकदान शिबिराचे झाले उद्घाटन

कणकवली (प्रतिनिधी) : युवा परिवर्तन प्रतिष्ठान – लोरे चे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते चंदू रावराणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फोंडाघाट रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गेली 10 वर्षे चंदू रावराणे व युवा परिवर्तन प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून रक्तदान शिबीर व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत आहेत. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीनगर महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून व दीपप्रज्ववलन करून रकदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सुशांत नाईक यांनी चंदू रावराणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. व आपण करत असलेल्या सामाजिक कार्याचा वसा आपण कायम ठेवावा. आपण गेली 10 वर्षे राबवत असलेला रक्तदान शिबीर व सामाजिक उपक्रम यामुळे गरजू लोकांना याचे सहाय्य होते. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या सोबत, उपतालुकाप्रमुख राजू रावराणे, महिला उपतालुका प्रमुख संजना कोलते, माधवी दळवी, प्रितम रावराणे, रमेश राणे, चंदू मेस्त्री, उमेश नवले, वैभव देवलकर, योगेश रावराणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!