एका बुथप्रमुखासाठी आमदार नितेश राणे नाडण गावात-ग्रामस्थांची दिशाभूल करून दाखवला खोटा प्रवेश – सुशांत नाईक यांचा आरोप
काल प्रवेश दाखवलेले संतोष बाईत यांचे शिवसेने सोबत येत स्पष्टीकरण
देवगड (प्रतिनिधी) : युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्तितीत आज नाडण गावात बैठक संपन्न झाली. यावेळी सुशांत नाईक यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला काल प्रवेश दाखवल्या संदर्भात चर्चा करण्यात आली. काल प्रवेश दाखवलेल्या संतोश बाईत यांनी आपली दिशाभूल करून प्रवेश घेण्यात आला असे सांगण्यात आले. आपण शिवसैनिकच आहोत आणि कायम राहणार असे स्पष्ट मत यावेळी संतोष बाईत यांनी मांडले. गावातील ग्रामस्थांची दिशाभूल करून आमदार नितेश राणे कणकवली विधानसभा मतदार संघात खोटे प्रवेश दाखवत आहे असा घणाघाती आरोप यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी नितेश राणेंवरती केला. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासोबत सरपंच सुनील जाधव, विभागप्रमुख रमा राणे, संजय तावडे, सुहास वाडेकर, शशांक तावडे, गणेश तानवडे, मोंडे, देवेंद्र घाडी, सुनील महाडिक, योगेश मिराशी, पिंटू नारकर, संतोष बाईत, आकाश मोरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.