दोडामार्ग (प्रतिनिधी) : सासोली येथील कथित जमीन घोटाळा विरोधात शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी सहकाऱ्यांसह आज दोडामार्ग मध्ये आंदोलन केले होते. आंदोलनादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी दोडामार्ग पोलीस ठाण्यात संदेश पारकर यांच्यासह संजय गवस रा पिकुळे ता दोडामार्ग, संजय नारायण नाईक रा -आईनवडे पुनर्वसन दोडामार्ग, सुनील गवस रा – मांगेली दोडामार्ग, संदेश भुजबळ रा सासोली दोडामार्ग,मनोज रामचंद्र गवस रा -सासोली दोडामार्ग,विजय ठाकूर रा -सासोली दोडामार्ग, सुभाष दळवी रा -पाळये दोडामार्ग, विष्णू नाईक रा -सासोली दोडामार्ग,आनंद ठाकूर रा -सासोली दोडामार्ग, महेश ठाकूर रा -सासोली दोडामार्ग,रेहान लतीफ रा-सातेरी भेडशी दोडामार्ग यांच्यासह सुमारे 60 ते 70 जणांवर जमावबंदी आदेशभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय गवस यांनी दिली.
संदेश पारकर यांच्यासह 70 जणांवर गुन्हा दाखल












