सामाजिक कार्यकर्ते रुपेश सावंत व सतीश गुरव यांचे कडून

खारेपाटण हायस्कूलच्या क्रीडा विभागासाठी २८०००/- रुपये किमतीचे क्रीडा साहित्य भेट

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कूल मधील शालेय विद्यार्थ्याना क्रीडा स्पर्धेच्या नियमित सरावाकरिता शाळेच्या क्रीडा विभागाला या शाळेचे माजी विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते रुपेश सावंत व सतीश गुरव तसेच खारेपाटण शिक्षण संस्थेने मिळून सुमारे २८००० /- रुपये किमतीचे क्रीडा साहित्य नुकतेच शाळेकडे सुपूर्द केले.

कणकवली तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा सध्या सुरू आहेत. या शालेय क्रीडा स्पर्धामध्ये खारेपाटण हायस्कूलचे विद्यार्थी सहभागी होत असतात. या विद्यार्थ्यांना या स्पर्धेमध्ये उत्तम पद्धतीने सहभाग घेताना विविध क्रीडा साहित्याची गरज भासते. ही गरज ओळखून खारेपाटण हायस्कूलचे माजी विद्यार्थी प्रसिद्ध उद्योजक व समाजसेवक रुपेश सावंत यांनी १०००० /- रुपये व सामाजिक कार्यकर्ते सतीश गुरव यांनी ८००० /- रुपये तसेच खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेने १०००० /- रुपये अशी संयुक्तिक सुमारे २८०००/- रुपये एवढे देणगी देऊन शाळेला क्रीडा साहित्य घेण्यासाठी मदत केली.दात्यांच्या या देणगीतून सुमारे २८००० /- हजार रुपये किमतीचे क्रीडा साहित्य प्रशालेला नुकतेच भेट देण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संजय सानप,क्रीडा शिक्षक पाडवी सर,रामदास भिसे सर आदी उपस्थित होते. या क्रीडा साहित्यामध्ये क्रिकेट किट, हॉलीबॉल ,थ्रो बॉल व अन्य क्रीडा साहित्याचा समावेश आहे.

शाळेचे माजी विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते रुपेश सावंत व सतीश गुरव यांनी सामाजिक बांधिलकी जपत खारेपाटण हायस्कूलच्या क्रीडा विभागासाठी क्रीडा साहित्य घेण्यासाठी केलेल्या आर्थिक मदती बद्दल देणगीदारांचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक संजय सानप यांनी आभार मानले आहेत.

error: Content is protected !!