वैभववाडी (प्रतिनिधी) : उंबर्डे मोपेरकरवाडी येथील अमोल परशुराम मोपेरकर वय 33 या अविवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
मयत अमोल मोपेरकर हा आपली आई मालती मोपेकर यांच्या सोबत राहत होता. गेले काही महिने त्याची मानसिक स्थिती बिगडली होती. बुधवारी सकाळी त्याची आई मालती मोपेरकर या उंबर्डे येथे काही कामानिमित्त गेल्या होत्या. त्यावेळी तो घरात एकटाच होता. त्या उंबर्डेहुन परत आल्या तर घरात वाशाला रस्सीने गळ फास घेतलेल्या स्थितीत दिसून आला. त्यांनी आरडा ओरडा केल्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेतली. मात्र तो मयत झाला होता. याबाबत वैभववाडी पोलिसांना पोलीस पाटील विजय दळवी यांनी खबर दिली. पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला. वैभववाडी ग्रामीण रुग्णालय येथे मृतदेहाचे सर्वविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याची मानसिक स्थिती बिघडल्यामुळे त्याने आत्महत्या केली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.त्याच्या पश्चाताप आई, भाऊ असा परिवार आहे.