राजकोट येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आयुर्मान १०० वर्षे – पालकमंत्री रवींद्र चव्हाण

गठित समितीच्या शिफारशीनुसार पुतळा उभारणार

ओरोस (प्रतिनिधी) : मालवण राजकोट येथे पुन्हा नव्याने उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याचे आयुर्मान किमान १०० वर्षे असणार आहे. संपूर्णपणे ब्राँझमध्ये पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. यात कोणतीही उणीव राहू नये याची दक्षता घेण्यात आली असून शासनाने गठित केलेल्या समितीच्या मार्गदर्शक व शिफारशीनुसार हा नवीन पुतळा उभारला जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.

कणकवली विधानसभा जनता दरबार निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या पालकमंत्री चव्हाण यांनी पुतळा उभारणी बाबत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुतळा पडण्याचे कारण आणि नवीन पुतळा कोणत्या पद्धतीने उभारावा यासाठी शासनाने दोन समित्या नियुक्त केल्या होत्या. या समितीत तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे समितीच्या सल्ल्यानुसार नवीन पुतळा उभारणीचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी राज्य शासनाने २० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने यासाठी निविदा प्रसिद्ध केली आहे, असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!