जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गनगरी तून हलविण्याबाबत शासकीय पातळीवर चर्चा नाही

संघर्ष समितीच्या शिष्टमंडळासमाेर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ठ केली भुमिका

ओरोस (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद रुग्णालय जिल्ह्याची राजधानी सिंधुदुर्गनगरी येथून हलवण्याचा प्रश्नच नाही. शासकीय मेडिकल कॉलेजला हे रुग्णालय सलग्न आहे. येथून जिल्हा रुग्णालय हलविण्याबाबत शासकीय पातळीवर कोणतीही चर्चा झालेली नाही, अशी स्पष्ट भूमिका पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा मुख्यालय विकास संघर्ष समितीच्या शिष्टमंडळा समोर स्पष्ट केली.

दरम्यान मेडीकल कॉलेजकरिता नव्या इमारती बांधण्यात येत असल्याने जिल्हा रुग्णालयाच्या जुन्या इमारती पाडाव्या लागत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी ३० रोजी बैठक घेऊन जिल्हा रुग्णालयाला तत्काळ जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश सुद्धा यावेळी मंत्री चव्हाण यांनी दिले.

जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गनगरी येथुन स्थलातर होऊ नये यासाठी जिल्हा रुग्णालय बचाव समितीची बैठक बुधवारी ओरोस रवळनाथ मंदिर येथे पार पडली होती. यात मुख्यालय विकास संघर्ष समिती स्थापन केली गेली. या समितीच्या शिष्टमंडळाने जनता दरबारच्या निमित्ताने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व चर्चा केली. यावेळी मुख्यालय विकास संघर्ष समितीचे समन्वयक महेश उर्फ छोटू पारकर, उदयकुमार जाभवडेकर , पांडुरंग मालणकर, अमित भोगले, हार्दिक शिगले, सत्यवान चव्हाण, गोपाळ हरमलकर, शुभम परब, रावजी यादव, प्रकाश जैतापकर, सुनील जाधव, सुशील निबरे, प्रशांत राणे आदी सह सिंधुदुर्गनगरीं पंच क्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते

error: Content is protected !!