कुरंगवणे – बेर्ले ग्रामपंचायतीच्या वतीने पोलीस नाईक उद्धव साबळे यांचा सत्कार संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावच्या आऊट पोस्ट पोलीस स्टेशन पोलीस अधिकारी उद्धव साबळे यांची नुकतीच प्रशासकीय बदली वैभववाडी येथे झाली असल्या कारणाने खारेपाटण विभागातील कुरंगवणे – बेर्ले ग्रामपंचायतीच्या वतीने नुकताच त्यांचा सरपंच पप्पू ब्रम्हदंडे यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी उपसरपंच बबलू पवार ग्रामपंचायत सदस्य स्नेहा गोसावी,पोलीस पाटील देवेन गोसावी ग्रामसेवक गिरीश धुमाळे आणि गावचे ग्रामस्थ उपस्थित होते. खारेपाटण पोलीस दूरशेत्राचे पोलीस अधिकारी उद्धव साबळे यांनी खारेपाटण दशक्रोषित नागरिकांना चागल्या प्रकारची सेवा दिली असून नोकरी बरोबरच प्रत्येक व्यक्तीशी पोलीस मित्र बनून मैत्री देखील जपली होती.खारेपाटण विभगातील गावात कायदा सुव्यवस्था चोख सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले. अशी प्रतिक्रिया कुरंगवने सरपंच पप्पू ब्रम्हदंडे यांनी सत्कार कार्यक्रमात व्यक्त केली.

error: Content is protected !!