कै.प्राजक्ता पेडणेकर यांच्या बाराव्या स्मृतिदिना निमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण….!

वायंगणी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक प्रकाश पेडणेकर यांचा स्तुत्य उपक्रम

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक प्रकाश पेडणेकर यांच्या सहचारीणी कै. प्राजक्ता प्रकाश पेडणेकर यांचा बारावा स्मृतिदिन 28 सप्टेंबरला वायंगणी भंडारवाडी येथील त्यांच्या निवास्थानी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण करून वेगळ्या पद्धतीने साजरा केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाणेश्वर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.वर्षा हातेकर प्रमुख पाहुणे मुणगे नं.1 शाळेचे विद्यार्थी प्रिय शिक्षक पांडुरंग नाडगौडा, श्रुती गोगटे उपस्थित होते.   प्रमुख पाहुण्यांने पांडुरंग नाडगौडा तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ. वर्षा हातेकर यांनी मुलांची कर्तव्ये व पालकांची जबाबदारी याबाबत सुंदर मार्गदर्शन केले. तर प्रकाश पेडणेकर सर यांनी कै. प्राजक्ता पेडणेकर यांच्या आठवणीना उजाळा दिला.

यावेळी माजी सरपंच संजना रेडकर, पोलीस पाटील सुनिल त्रिंबककर, श्रुती गोगटे मॅडम, पांडुरंग वायंगणकर,  विनोद मुणगेकर, माकांत नाईक, बहुसंख्य पालक, विद्यार्थीवर्ग व शिक्षणप्रेमी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!