वैभव मालंडकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कणकवली उपशहरप्रमुख तथा एसटी कामगार सेना कणकवली तालुकाप्रमुख, माथाडी कामगार सेना जिल्हा चिटणीस, हिंद भारतीय कामगार सेना तालुकाप्रमुख वैभव मालंडकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वैभव मालंडकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत आपल्या वाढदिवसानिमित्त करंजे येथील मतिमंद मुलांच्या शाळेत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. तसेच शाळेतील मतिमंद मुलांना खाऊवाटप करून त्यांच्यासोबत केक कापून आपला वाढदिवस साजरा केला. कणकवली उपजिल्हा रूग्णालयात रुग्णांना तसेच सर्व मेडिकल आणि  पॅरामेडिकल स्टाफलाही फळवाटप करण्यात आले. यावेळी यावेळी वैभव मालंडकर यांच्यासोबत जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक जयू धुमाळे, अविनाश चव्हाण, अमित वाळके,  अमेय आंबी, नयन यादव, नयन सुतार,  दुर्वांक मालंडकर, साई गोळवणकर,अमित पुजारे, सोमनाथ पारगावकर , 

अतिश कांदाळकर , तुषार गोळवणकर,  अभि पाटील ,गुरु गोळवणकर, सार्थक मालंडकर, अमित पुजारे, यश धुरी आदी उपस्थित होते. एकीकडे तरुणाईमध्ये वाढदिवस म्हटलं की मेजवानी आणि चंगळवाद बळावत असताना वैभव मालंडकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत साजरा केलेल्या वाढदिवसाबद्दल समाजात कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!