प्राणजीवन सहयोग संस्थेच्या वतीने 6 ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबिर

कै. राजश्री रघुनाथ चौकेकर यांच्या समरणार्थ शिरवल खासकीलवाडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : प्राणजीवन सहयोग संस्थेच्या वतीने रविवार 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत शिरवल गावातील खासकीलवाडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कै.राजश्री रघुनाथ चौकेकर यांच्या स्मरणार्थ हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. प्राणजीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष समाजभूषण पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ते संदीप चौकेकर यांच्या मातोश्री कै. राजश्री चौकेकर यांचे अलीकडेच निधन झाले. आई कै. राजश्री हिच्या स्मरणार्थ संदीप चौकेकर यांनी प्राणजीवन सहयोग संस्थेच्या वतीने हे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.रक्तदान हे जगात श्रेष्ठदान आहे. रक्तदान म्हणजे जीवदान दिल्यासारखेच असते. कै. राजश्री चौकेकर ह्या स्वतः परोपकारी वृत्तीच्या होत्या.त्यांची परोपकारी वृत्ती त्यांच्या निधनानंतरसुद्धा रक्तदान सारख्या पवित्र सामाजिक उपक्रमाद्वारे जपण्याचे काम चौकेकर कुटुंबीय करत आहेत. रक्तदात्यांनी प्रशांत गावडे मोबा. 9075231214 आणि कृष्णा यादव मोबा. 8010404986 यांच्याशी संपर्क साधावा.

error: Content is protected !!