खारेपाटण सकल मराठा समाजाच्या वतीने शाखा व्यवस्थापकांना देण्यात आले लेखी निवेदन
खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशितील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने आज सोमवार दि.७ ऑक्टोंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता खारेपाटण बाजारपेठ येथील स्टेट बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ महाराष्ट्र या दोन प्रमुख राष्ट्रीयकृत बँकेच्या असमाधानकारक कारभाराविषयी जाब विचारण्यासाठी व कर्तव्याची जाणिव करून देण्यासाठी खारेपाटण सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने अध्यक्ष रमाकांत राऊत यांच्या नेतृत्वाखाली आपले लेखी निवेदन दोन्ही बँकेच्या शाखा अधिकारी याना देण्यात आले.
यावेळी खारेपाटण पंचक्रोशी सकल मराठा समाजाच्या वतीने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा प्रबंधक श्रीमती योगिता ढोने यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.यामध्ये खारेपाटण मुंबई – गोवा महामार्गावर खारेपाटण स्टेट बँकेचे असलेले ए टी एम सद्या बंद अवस्थेत असून त्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत असून ते तातडीने सुरू करण्यात यावे आशी मागणी करण्यात आली आहे.तसेच खारेपाटण शाखेत अपुरा कर्मचारी वर्ग आसल्या कारणाने देखील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून ग्राहकांना तासान तास शाखा कार्यालयात बसून राहवे लागत आहे. तरी तातडीने वाढीव लिपिक शाखा कार्यालयात भरवा अशी मागणी देखील करण्यात आली आहे. याबरोबरच ग्राहकांना देण्यात येणारे विविध फॉर्म हे इंग्रजी किंवा हिंदी भाषेत असतात.ही बाब खेदजनक असून सदर फॉर्म भरताना ग्रामीण भागातील सर्वसामान्य सभासदांना त्रास सहन करावा लागतो.तरी बँकेत उपलब्ध करून देण्यात येणारे फॉर्म मराठी भाषेत सुधा उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
तसेच बँक ऑफ महाराष्ट्र शाखा खारेपाटण चे बँक मनेजर गणेश शिवथरे यांची देखील सकल मराठा समाज बांधवांनी भेट घेत वारंवार बँकेत नेट नसल्याच्या बाबत जाब विचारला.तसेच बँकेत ग्राहकांना सेवा देताना देण्यात येणारे फॉर्म हे मराठी भाषेत उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. बँकेचे नेटवर्क व्यवस्थित नेटवर्क नसल्या मुळे ग्राहकाना त्रास सहन करावा लागत असे.परंतु आपली सेवा आता सुरळीत सुरू असल्याचे यावेळी बँक मॅनेजर गणेश शिवथरे यांनी सांगितले.
खारेपाटण पंचक्रोशी सकल मराठा समाजाच्या वतीने अध्यक्ष रमाकांत राऊत यांसह उपाध्यक्ष अरुण कर्ले,खारेपाटण शहराध्यक्ष गुरुप्रसाद शिंदे,खजिनदार प्रताप फाटक,सचिव – सुबोध देसाई, कुरंगवणे अध्यक्ष सूर्यकांत पवार, नडगिवे अध्यक्ष,चंद्रकांत मण्यार,शेर्पे अध्यक्ष धनराज शेलार,पोलीस पाटील.दिगंबर भालेकर,नाना शिंदे,चंद्रमोहन शिंदे,रोहिदास शिंदे,बबलू पवार,सुनील कर्ले, रामचंद्र राऊत,संदीप सावंत,भूषण शेलार, सूर्यकांत पवार आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खारेपाटण शाखेच्या मॅनेजर ग्रहकाना होणाऱ्या गैरसोयी बाबत आपण काहीच करू शकत नसल्याचे सांगितले.याबाबत आपण वरिष्ठ पर्यंत ही बाब कळविली तरी चालेले अशी काही उद्धट उत्तरे दिल्यामुळे तसेच देत असल्यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे यावेळी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने सांगण्यात आले.जर खारेपाटण मधील दोन्ही बँकांच्या ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सेवांमध्ये बदल न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशारा खारेपाटण पंचक्रोशी सकल मराठा समाज बांधव संघटनेचे अध्यक्ष श्री रमाकांत राऊत यांनी यावेळी दिला.












