लिटिल फ्लॉवर इंग्लिश स्कूल ” च्या भक्तिमय सरस्वती पूजनात ” विद्या, विनयेन शोभते ” संस्कार !

विद्यार्थी- शिक्षकवर्ग-पालक आणि मुलांच्या उल्हासात सरस्वती पूजन!

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचलित लिटिल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सरस्वती पूजन सोहळा मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहाने साजरा करण्यात आला. प्राचार्या विनया लिंगस यांनी श्रीशारदा पूजन करून, प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी बच्चेकंपनीने खोबरे- काकडी- साखर इत्यादी पंचखाद्याचा नैवेद्य दाखवून, प्रसादाचे सर्वांना वाटप केले. छोट्या लिटिल फ्लॉवर्सनी आपल्या निरागस आवाजात सरस्वती स्तवन, प्रार्थना केली. आणि एकात्मतेचे दर्शन घडविले.त्यानंतर विविध स्तोत्र पठण, भजन पदे, भक्तीगीते गाऊन रंगत आणली. त्यानंतर दांडिया नृत्य आणि एकच रंगत आली .यामध्ये मुलांबरोबर शिक्षकांनी ठेका धरून आनंद लुटला. यामध्ये सहाय्यक शिक्षिका करुणा चिंदरकर, रिया भिसे, गौरी गावकर,नीलाक्षी चव्हाण, श्वेता शिंदे, प्राजक्ता लाड, सहाय्यक उर्मिला कुशे इत्यादी सहभागी झाल्या. शेवटी श्रीसरस्वती देवीला विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी, मनःशांतीसाठी आणि उत्कर्षासाठी सांगणे करून कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी पालकवर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या पाल्याचे आणि ” विद्या विनयेन शोभते ” या संस्कारक्षम उपक्रमाचे कौतुक केले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!