तहसीलदार वर्षा झालटे यांचा वाळू माफियांना झटका

५३५ ब्रास अवैध वाळूसाठा केला जप्त

मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या कठोर निर्देशानंतर महसूल प्रशासनाकडून धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. महसूल प्रशासनाने गुरुवारी सकाळी देवली माळरानावर तब्बल ५३५ ब्रास वाळू साठा जप्त केला आहे. एकूण अकरा डेपोंवर कारवाई करण्यात आली आहे. संबंधित वाळूचा ताबा पोलीस पाटील यांच्याकडे देण्यात आलेला असून जमिन मालकांचा शोध घेऊन त्यांना नोटीस बजावणी केल्यानंतर वाळूचा लिलाव करण्यात येणार असल्याचे महसूल प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मालवण तालुक्यात बेकायदेशीर वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी तहसीलदार वर्षा झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र गस्तीपथके तैनात करण्यात आलेली आहेत. तसेच काही गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई केल्या जात आहेत. देवली येथे मोठ्या प्रमाणात वाळू साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल विभागाच्या पथकाने धडक कारवाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!