१४ ऑक्टोबर रोजी होणार नामकरण सोहळा ; आमदार नितेश राणे यांची उपस्थिती
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय. टी आय ) या संस्थेला वैभववाडी तालुक्याचे एडगावचे सुपुत्र शहीद विजय साळसकर असे नाव देण्यात आले आहे.नुकताच तसा शासन निर्णय झाला आहे. दिनांक १४ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत एडगांव आय.टी.आय.-येथे हा नामकरण सोहळा सपन्न होणार आहे.अशी माहिती महाराष्ट्र राज्य सह. पणन महासंघाचे संचालक प्रमोद रावराणे यांनी दिली आहे.
राज्यातील १०८ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नावात बदल करून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती, समाज सुधारकांची नावे देण्याचा प्रस्ताव ४ ऑक्टोबर २०२४रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. यानुसार वैभववाडी येथील शासकीय औद्योगिक संस्थेला वैभववाडी तालुक्यातील एडगाव गावचे सुपुत्र, 26/ 11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले विजय साळसकर यांचे नाव देण्याचा शासन निर्णय झाला आहे. शासनाच्या या निर्णयाचे तालुक्यातील जनतेकडून स्वागत करण्यात येत आहे.
१४ ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक १० वाजता आमदार नितेश राणे,जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला तालुक्यातील जनतेने उपस्थित राहावे.असे आवाहन रावराणे यांनी केले आहे.












