RWG Trading Pvt. Ltd. कंपनीने जोपासली सामाजिक बांधिलकी
चौके (प्रतिनिधी) : “प्रत्येक जण स्वतःसाठी जगत असतो परंतु संदिप परब यांनी दुसऱ्यासाठी जगण्याची भूमिका घेतली आहे त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे. समाजातील निराधार, मनोरुग्ण, वृद्ध व्यक्तींना संविता आश्रमात आणून त्यांची सेवा करण्याच आणि त्यांना सन्मानने जगण्याची प्रेरणा देण्याच बहुमूल्य काम संदिप परब सर करत आहेत त्याबद्दल त्यांच्या या कार्याला सलाम आहे. त्यांच्या या कार्यात आज RWG कंपनीने खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे. ” असे प्रतिपादन RWG Trading Pvt. Ltd. कंपनीचे चेअरमन डॉ. राजेश माने यांनी संविता आश्रम पणदूर येथे बोलताना केले.
सिंधुदुर्ग कुडाळ येथील RWG Trading Pvt. Ltd. या कंपनीच्या २३ ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या ७ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून मंगळवार दिनांक १८ ऑगस्ट रोजी पणदूर येथील संविता आश्रमातील निराधारांसाठी जीवनावश्यक साहित्य तसेच आर्थिक मदत आश्रमाचे संस्थापक संदिप परब यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. तसेच यावेळी निराधार व्यक्तींची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली व त्यांना गोड खाऊ सुद्धा वाटण्यात आले.
यावेळी कंपनीचे चेअरमन डॉ. राजेश माने, मॅनेजिंग डायरेक्टर विष्णू परब, अमोल गोसावी, रितेश सावंत, पूजा आयरेकर, पल्लवी पडवेकर, ऋतुजा मेस्त्री, कीर्ती जाधव, प्रमोद नाईक, शंकर दळवी, स्वप्नाली दळवी, रामचंद्र कोकरे, संकेत कुडकर, अशोक बिरमोळे, संतोष हिवाळेकर, अजित राऊळ, गीता राऊळ, सुधीर जडये, ज्ञानेश्वर जाधव, पियुष्का लाड, निशिगंधा कुडाळकर आदी जण उपस्थित होते.











