पालकमंत्री नितेश राणे यांचे केले अभिनंदन…!
शिरोडा-वेळागर ‘ताज’ प्रकल्पासाठी त्रिपक्षीय करारावर होताच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आनंदोत्सव
रोजगार, पर्यटन वाढ, आर्थिक सुबत्ता ,आणणारा महत्वाचा प्रकल्प उभा राहणार
वेंगुर्ले (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्न आणि पुढाकार घेतल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा-वेळागर येथे ताज हॉटेल उभारण्यासाठी त्रिपक्षीय करारावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती झाले. ३८ वर्षे प्रलंबीत राहिलेल्या या प्रकल्पासाठी करारांवर स्वाक्षरी झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. भाजपा तर्फे वेंगुर्ले कार्यालयासमोर तालुका अध्यक्ष विष्णु उर्फ पप्पू परब यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि लाडू वाटून आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान या प्रकल्पामुळे येथील तरुणांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे आम्ही स्वागत करत असल्याचे भाजपा तालुका अध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब यांनी यावेळी बोलताना सांगितले.
सिंधुदुर्गाला एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याच्या दिशेने आज एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (IHCL), महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) आणि स्थानिक जमीनदारांच्या प्रतिनिधी मंडळात आज हा करार झाला, ज्यामुळे या बहुप्रतिक्षित महत्त्वाच्या लक्झरी हॉस्पिटॅलिटी प्रकल्पाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीमती सुनेत्रा पवार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, सावंतवाडी-वेंगुर्लाचे आमदार दीपक केसरकर, आणि आयएचसीएलचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत छटवाल, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (MTDC) व्यवस्थापकीय संचालक (MD) नीलेश गटणे तसेच वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मंत्रालयात या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
शिरोडा-वेळागर येथील प्रस्तावित ताज प्रकल्प हा सिंधुदुर्गच्या पर्यटन क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा ठरेल आणि एक उच्च-मूल्यवान पर्यटन स्थळ म्हणून जिल्ह्याचे स्थान अधिक मजबूत करेल अशी अपेक्षा आहे. हा प्रकल्प एक प्रमुख आलिशान आतिथ्य विकास म्हणून संकल्पित करण्यात आला आहे, जो कोकण प्रदेशाचे नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक समृद्धी दर्शवेल, तसेच स्थानिक समुदायांसाठी नवीन संधी निर्माण करेल. या विकासामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची, स्थानिक उद्योजकतेला चालना मिळण्याची आणि शेतकरी, कारागीर, वाहतूक व्यावसायिक, मार्गदर्शक, उपक्रम प्रदाते व इतर पर्यटन-संबंधित व्यवसायांकडून उत्पादने आणि सेवांची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे.
वेंगुर्ले येथे आनंदोत्सव साजरा करताना उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, पंचायत समिती सभापती शंकर घारे, पंचायत समिती सदस्य संकेत धुरी, युवा मोर्चा अध्यक्ष प्रणव वायंगणकर, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, तालुका सरचिटणीस तथा मच्छीमार सेल चे अध्यक्ष वसंत तांडेल, तालुका चिटणीस श्रीकृष्ण धानजी, तालुका कार्यकारणी सदस्य संतोष अणसूरकर, नगरसेवक सुषमा प्रभुखानोलकर, शीतल आंगचेकर, सुधीर पालयेकर, युवराज जाधव, प्रितम सावंत, सदानंद गिरप, काजल कुबल, आकांक्षा परब, सचिन शेट्ये, शक्तिकेंद्र प्रमुख सायमन आल्मेडा, मयुरेश शिरोडकर, बूथ अध्यक्ष भानुदास कुबल, अर्जुन तांडेल, किशोर रेवणकर, देवेंद्र वस्त, श्याम खोबरेकर, नारायण गावडे, उपसरपंच अनंत केळजी, विश्वनाथ धुरी, सदानंद गावडे, मनोज उगवेकर, संतोष धानजी, युवा कार्यकर्ते मारुती दोडशानटी, तुषार साळगांवकर, हितेश धुरी, गौरेश खानोलकर, गुरु राणे, हर्ष कोचरेकर, गौरेश गावडे, योगेश सरमळकर, अमित गावडे, तनिष धोंड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.












