पाडलोस रवळनाथ मंदिरात श्रावण भक्तिमय वातावरणात

पाडलोस शाळेसमोरील वळणावर दुचाकी-टेम्पोची धडक; गतिरोधकाच्या मागणीकडे दुर्लक्ष

बांदा (प्रतिनिधी) : पाडलोस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ समोरील मुख्य रस्त्यावरील धोकादायक वळणावर मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास दुचाकी व टेम्पोची धडक होऊन अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला आहे. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. मिळालेल्या माहितीनुसार, शेर्ले येथील दुचाकीस्वार या मार्गावरून जात असताना समोरून येणाऱ्या गोवा येथील एका टेम्पोची वळणावर धडक झाली. अपघातानंतर परिसरात काही काळ गर्दी झाली. दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून दुचाकीस्वाराला किरकोळ दुखापत झाली. संबंधितांनी सामोपचाराने प्रकरण मिटविले.

दरम्यान, शाळेसमोरील या धोकादायक वळणावर वारंवार अपघात होत असल्याने येथे तातडीने गतिरोधक उभारण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. शाळेच्या परिसरात लहान मुले ये-जा करत असल्याने या ठिकाणी वाहनांचा वेग नियंत्रित करणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, वारंवार मागणी करूनही संबंधित विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

गतिरोधक उभारण्याची मागणी वारंवार करूनही संबंधित विभाग दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघात घडत आहेत. भविष्यात मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी संतप्त प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते सागर गावडे यांनी व्यक्त केली. ८ वाजता गावातील ग्रामस्थ एकत्र येत भजन, नामस्मरण व भक्तिगीतांच्या माध्यमातून देवाची आराधना करत आहेत.

श्रावण महिन्यातील धार्मिक परंपरा जपत ग्रामस्थांच्या सहभागातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. भजनाच्या माध्यमातून गावात आध्यात्मिक व भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांमध्ये एकोपा आणि धार्मिक भावनाही वृद्धिंगत होत आहेत. विविध पारंपरिक अभंग, भक्तिगीते व नामस्मरणाने मंदिर परिसर दररोज दुमदुमून जात आहे.

गावातील महिला, पुरुष तसेच ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. श्रावण महिनाभर दररोज होणाऱ्या या भजन कार्यक्रमामुळे श्री देव रवळनाथ माऊली पंचायतन मंदिर परिसराला भक्तीचा जागर लाभला आहे. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भजन व नामस्मरणात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!