आंबडपाल येथे उद्यानविद्या कार्यानुभव अंतर्गत शेतकऱ्यांसाठी चर्चा सत्र संपन्न

शेतीत हाेणारे बदल व उन्हाळी भाजीपाला लागवडी विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

कुडाळ (प्रतिनिधी) : आंबडपाल येथे 11 ऑक्टोंबर 2024 रोजी ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत भूमीजा गटातर्फे शेतकऱ्यांसाठी चर्चा सत्र पार पडले.या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून उद्यानविद्या महाविद्यालय मुळदेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.माळी यांनी शेतकऱ्यांना बदलत्या काळात शेतीमध्ये होणाऱ्या बदलांविषयी मार्गदर्शन केले. तसेच उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ.महेश शेडगे यांनी शेतकऱ्यांना उन्हाळी भाजीपाला लागवड या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात माती परीक्षणाचे अहवाल मान्यवरांच्या हस्ते शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले व शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन देखील करण्यात आले.

या कार्यक्रमास आंबडपाल गावचे सरपंच महेश मेस्त्री उपस्थित होते. या कार्यक्रमास गावातील सर्व शेतकऱ्यांनी विशेषतः महिला शेतकऱ्यांनी माेठ्या संख्येने सहभाग दर्शविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!