बांदा (प्रतिनिधी) : बांदा उभाबाजार येथील रविंद्र जगन्नाथ नार्वेकर (वय – 81) यांचे मंगळवारी पहाटे गोवा बांबोळी येथे उपचारादरम्यान दु:खद निधन झाले. मंगळवारी दुपारी बांदा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते सेवानिवृत्त शिक्षक होते. बांदा येथील सिया गारमेंट च्या सिया उर्फ प्रिती प्रभु यांचे ते वडील तर संदीप प्रभु यांचे सासरे होत.
सेवानिवृत्त शिक्षक रविंद्र नार्वेकर यांचे निधन












