देव- देश अन धर्मा पायी लोकजागृती-हिंदुत्व रक्षणासाठी, फोंडाघाट मध्ये श्री दुर्गामाता दौड उत्साहात !

श्री शिवशंभो सामाजिक कला- क्रीडा मंडळ, फोंडाघाट आणि श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान- कणकवली तर्फे यशस्वी आयोजन !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : नवरात्रोत्सवाचे अन भवानी मातेच्या जागराचे अवचित्य साधून, श्रीशिवशंभो सामाजिक कला- क्रीडा मंडळ, फोंडाघाट आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान- कणकवली तर्फे श्रीदुर्गामाता दौड, फोंडाघाट एसटी स्टँड ते कुळाची वाडी श्रीशिवस्मारकापर्यंत मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यामध्ये ध्वजवाहक धारकरी आणि शिवकालीन पारंपारिक वेशभूषेत असंख्य अबाल वृद्ध- युवाई ,भाले -तलवारी शस्त्रात्रासह सहभागी झाले होते.

आज आपल्या धर्मावर येऊ घातलेली असंख्य संकटे आणि त्याचे होणारे परिणाम पाहता, जाज्वल्य हिंदुत्वासाठी आणि देव- देश अन धर्मासाठी सर्व हिंदू समाजात एकजूट होऊन, संघटना सुदृढ व्हावी, विशेषता येणारी पिढी सजग होऊन सक्षम व्हावी. यासाठी संपूर्ण भारतात औचित्यपूर्ण दौड आयोजित केली जाते. या स्फूर्ती देणाऱ्या दौडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भवानी मातेचा बुलंद जयजयकार होत होता, तर हर हर महादेव च्या उत्तुंग घोषणांनी आसमंत दुमदुमला. या दौडीचे ठिकठिकाणी स्वागत करून ध्वज धारकाचे औक्षण करून शुभेच्छा देण्यात आल्या .एसटी स्टँड बाजारपेठ मारुती वाडी मार्गे हनुमान मंदिराकडून शिवस्मारकापर्यंत या दौडीने मार्गक्रमण केले. अखेर शिवस्मारक भवानी चौक येथे श्री दुर्गा माता दौडीची यशस्वी सांगता करण्यात आली…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!