प्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन

वयाच्या 57 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई (ब्युराे न्यूज) : मराठी रंगभूमी आणि मनोरंजन विश्वातील चतुरस्त्र अभिनेता अतुल परचुरे यांचं निधन झाले. अभिनय क्षेत्र व विविध क्षेत्रातून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त होत आहे. सुप्रसिद्ध नृत्य प्रशिक्षक तथा नृत्यदिग्दर्शिका सोनिया परचुरे यांचे ते पती होत.जवळपास वर्षभरापूर्वी अतुल परचुरे यांनी कर्करोगावर यशस्वी मात केल्याची त्यांनी स्वत:च माहिती दिली होती.अतुल परचुरे हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेते होते. मराठी सिनेमा, नाटक आणि मालिकांमधून ते घराघरात पोहोचले होते.सिनेमा, नाटक आणि मालिकांमधून आपल्या विनोदानं प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचं काम त्यांनी केलं. तसंच, अनेक गंभीर भूमिकाही त्यांनी लीलया पेलल्या.अतुल परचुरे यांच्या निधनानं मराठी मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे.अतुल परचुरे यांनी कर्करोगावर यशस्वी मात केली होती. त्यातून बाहेर आल्यानंतर ते पुन्हा अभिनय करण्यास सुरुवात केली होती. कॅन्सरवरील उपचार पूर्ण झाले होते. मात्र, अचानक पुन्हा त्रास सुरू झाल्याने त्यांना पाच दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल केलं होतं.अतुल परचुरे ‘सूर्याची पिल्ले’ नाटक करणार होते आणि त्याची तयारी सुरू होती,

“तरुण तुर्क म्हातारे अर्क, नातीगोतीसारखी नाटकं असोत किंवा पु. ल. देशपांडे यांचा शाब्दिक, वाचिक विनोद असो, अतुल परचुरे यांनी आपल्या अंगभूत गुणांनी त्यात गहिरे रंग भरले.मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी उत्तम व्यक्तिरेखा साकारल्या. त्यांच्या जाण्यामुळे मराठीतला एक अभिजात अभिनेता हरपला आहे.

error: Content is protected !!