किल्ले विजयदुर्ग येथे छत्रपातींच्या आरमार सृष्टी उभारणी कामाचे आमदार नितेश राणेंच्या हस्ते झाले भूमिपूजन
विजयदुर्ग प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांची आरमार सृष्टी उभारल्यामुळे केवळ राज्यातील आणि देशातील नव्हे तर जगभरातील पर्यटक किल्ले विजयदुर्ग मध्ये येतील. पर्यटनाच्या माध्यमातून विजयदुर्ग मध्ये स्थानिकांना रोजगार उपलब्ध मिळणार आहे. किल्ले विजयदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची आरमार सृष्टी उभारण्याच्या कामाचा शुभारंभ माजी आमदार प्रमोद जठार यांच्यामुळे होत आहे. जठार यांनी मोठ्या जिद्दीने छत्रपती शिवाजी महाराजांची आरमार सृष्टी किल्ले विजयदुर्ग येथे उभारली जाणार आहे.
सिंधुरत्न समृद्धी योजनेंतर्गत किल्ले विजयदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची आरमार सृष्टी उभारण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. सिंधुरत्न समृद्ध योजनेतून यासाठी साडेचार कोटींचा निधी मंजूर झाला आहे.त्यावेळी आमदार नितेश राणे बोलत होते.यावेळी विजयदुर्ग सरपंच रियाझ काझी किल्ले विजयदुर्ग चे आठव्या पिढीतील सरदार रघुनाथ धुळप, सिंधुरत्न योजनेचे सदस्य माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार अजित गोगटे, प्रकाश देशपांडे, कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, भाजपा तालुकाध्यक्ष बंड्या नारकर, राजू शेट्ये, आरिफ बगदादी, बाळ खडपे, संदीप साटम, प्रियांका साळसकर, विलास साळसकर, उपअभियंता श्रीनिवास बासूतकर आदींसह विजयदुर्ग ग्रामस्थ उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले की, किल्ले विजयदुर्ग हा देवगड तालुक्याची महत्वाची ओळख आहे. आरमार सृष्टी मुळे स्थानिकांना रोजगार हा आपल्या गावातच मिळणार आहे. या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा ही अपेक्षा आहे. पडेल मध्ये वॉटर पार्क सुद्धा महायुती शासनाच्या माध्यमातून निर्माण केले जाणार आहे.त्यासाठी सरपंच भूषण पोकळे यांनी जागाही उपलब्ध करून दिली आहे.विजयदुर्ग ते तळेरे हा दुपदरी काँक्रीटीकरण राज्यमार्ग होत असल्याने पर्यटकांचा ओघ किल्ले विजयदुर्ग येथे वाढणार आहे. येथील स्थानिक युवकांनी सौदी अरब मध्ये जाण्यापेक्षा गावात राहून स्वरोजगार निर्माण करावा असे आवाहन केले. पुढे आमदार मीच असणार . मुख्यमंत्री पालकमंत्री सुद्धा आमचाच असणार असे सांगत भूमिपूजन नंतर आरमार सृष्टी उदघाटनलाही मीच येणार असा विश्वासही आमदार नितेश राणे यांनी केला.












