घोणसरी ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडून बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ

गवंडी कामगार, बांधकाम कामगारांनी सरपंच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना घातला घेराव

फोंडाघाट (प्रतिनिधी) : बांधकाम कामगारांना 90 दिवस काम केले बाबतचे प्रमाणपत्र मिळणे बाबत ग्रामपंचायत घोणसरी येथील बांधकाम कामगार ,गवंडी कामगार यांनी घोणसरी ग्रामपंचायत येथे सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांना घेराव घातला. तसेच फोंडा पंचक्रोशी मधील इतर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सदर प्रमाणपत्रावर सह्या करत आहेत फक्त आपल्याच ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी सह्या करत नाहीत याबाबत सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांना जाब विचारण्यात आला. किमान नूतनीकरण अर्जावर सही करावी या बाबत निवेदन देण्यात आले.खरे व गरजू कामगार लाभापासून वंचित राहत असल्याची खंत या वेळी उपस्थित ग्रामस्थांनी बोलून दाखवली.तंटामुक्ती अध्यक्ष श्री.अशोक राणे व गावातील बांधकाम कामगार,मजूर इ.उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!