माझ्या आयुष्यातील गावाच्या विकासाचे पहिले स्वप्न पूर्ण होतंय यांचा अत्यानंद – धोंडी चिंदरकर

चिंदर गावच्या ऐतिहासिक शिवकालीन तलावाच्या सुशोभीकरण पायाभूत सुविधा विकास कामाचा शुभारंभ

पाच कोटी निधीस प्रशासकीय मान्यता

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर गावाच्या विकासाचे पर्यटन दृष्ट्या महत्वपूर्ण पाऊल असलेल्या ऐतिहासिक शिवकालीन तलावाच्या सुशोभीकरण करणे, पायाभूत सुविधानचा विकास करणे या कामाचा शुभारंभ आज आकारी ब्राह्मण देवास बारापाच मानकरी नारायण पाताडे यांच्या वतीने गाऱ्याण घालून करण्यात आला. या कामासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन 2024-25 अंतर्गत 5 कोटी निधी मंजूर झालेला आहे.

यावेळी बोलताना भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर म्हणाले की चिंदर गावच्या विकासातील माझी आयुष्यातील दोन स्वप्न होती त्या पैकी एक अत्यत महत्व पूर्ण असे रोजगार निर्मिती होणार पहिलं स्वप्न आज पूर्ण होतंय याचा मला अत्यानंद होत आहे. यासाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, भाजप नेते निलेश राणे, पालकमंत्र्यांचे स्वकीयसचिव अनिकेत पटवर्धन यांचे धोंडी चिंदरकर यांचे आभार मानले.

यावेळी भाजप नेते संतोष कोदे,मालवण शहर प्रभारी संतोष गावकर, भाजप तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर,चिंदर पंचायत समिती प्रभारी प्रकाश मेस्त्री, उद्योग आघाडी तालुकाध्यक्ष मंगेश गांवकर, उपसरपंच दिपक सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य शशिकांत नाटेकर, महेंद्र मांजरेकर, सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, बूथ अध्यक्ष अरविंद घाडी, दिगंबर जाधव,हिमाली अमरे, चंद्रशेखर पालकर, बंटी भोंवर, रोहित पाटील, प्रकाश परब, ब्रम्हानंद तावडे, भाई अपराज, गिरीश पवार, अमोल साटम, रवि घागरे, शेखर पाताडे, शालीवाहन गोलतकर, सागर परब, रमेश घाडी, तेजस घाडी, पाटणकर, विवेक खांडेकर, विश्राम माळगावकर, पवार, चिले आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!