नितेश राणेंना भाजपाच्या पहिल्याच यादीत विधानसभा उमेदवारी जाहीर

कणकवली-देवगड-वैभववाडी मतदारसंघातून नितेश राणे तिसऱ्यांदा लढणार निवडणूक

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघातून आमदार नितेश राणे यांना भारतीय जनता पार्टीने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत उमेदवारी दिली आहे. 99 उमेदवारांची पहिली यादी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय कार्यालयाने जाहीर केली. यात आमदार नितेश राणे यांना उमेदवारी घोषित केली आहे.
पहिल्याच यादीत ही उमेदवारी जाहीर झाल्याने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.ठिकठिकाणी फटाके फोडून जल्लोष साजरा केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!