मालवण माजी नगरसेवक पूजा करलकर यांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती दूत पुरस्कार प्रदान

मला मिळालेला पुरस्कार हा समस्त मालवण वासियांचा बहुमान – पूजा करलकर

आचरा (प्रतिनिधी) : समर्थ सोशल फौंडेशन कोल्हापूर या संस्थेच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधूमेहमुक्ती पुरस्कार मालवण येथील माजी नगरसेविका पूजा प्रमोद करलकर यांना नुकताच कोल्हापूर येथील हॉटेल सयाजी येथे देवून सन्मानीत करण्यात आले.

समर्थ सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सादिक शेख, संचालक सागर देसाई, संचालक अस्लम शेख, संचालक सुधस पाटील व डॉ. बाळ माने यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सुमारे १ हजार लोकांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या सोहळ्याला पूजा यांचे पती प्रमोद किसन करलकर, मुलगा दिप करलकर व मित्र परिवार ही उपस्थित होते.

दरवर्षी समर्थ सोशल फाउंडेशन संस्थेकडून राज्यभरात सामाजिक कार्य करून लाखो लोकांना व्यसनमुक्त व मधुमेह मुक्त मधील कार्यासाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीना पुरस्कार दिला जात. यावर्षी हा पुरस्कार मालवण नगरसेविका सौ पूजा प्रमोद करलकर यांना दिला गेला हा मालवणचा बहुमान आहे.

या पूढे ही असेच आपले उल्लेखनीय काम निश्चित्व चालू ठेवून देशाच्या हित्तासाठी आपण खारीचा वाटा म्हणून काम करत राहणार असल्याचे पूजा करलकर यांनी सांगितले पुरस्कार मिळाल्याबद्‌द करलकर यांनी समर्थ सोशल फाउंडेशन या संस्थेचे अध्यक्ष, संचालक, वरिष्ठ पदाधिकारी यांचेही आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!