माजी आमदार परशुराम उपरकर यांनी बांधले शिवबंधन

पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर केला पक्षप्रवेश

कणकवली (प्रतिनिधी) : अखेर माजी आमदार परशुराम उपरकर यांनी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर जाहीर पक्षप्रवेश केला आहे. यावेळी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर,माजी खासदार विनायक राऊत, संदेश पारकर, सतीश सावंत, अतुल रावराणे , संजय पडते, संग्राम प्रभुदेसाई आदी उपस्थित होते. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने विधानपरिषद सदस्य झालेल्या माजी आमदार परशुराम उपरकर यांनी तब्बल 12 वर्षांनी पुन्हा ठाकरे शिवसेनेत स्वगृही प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर उपरकर यांनी केलेला पक्षप्रवेश महत्वाचा मानला जात आहे. उपरकर यांच्यासह त्यांचे समर्थक आशिष सुभेदार,बाबल गावडे, दीपक गावडे, अप्पा मांजरेकर , राजेश टंगसाळी, विनोद सांडव, नाना सावंत आबा चिपकर, शैलेश मयेकर, मंदार नाईक, अभय देसाई, प्रकाश साटेलकर, सुरेंद्र कोठावळे,मनोज कांबळी, यांनीही ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!