शिवसेना खारेपाटण विभागिय अध्यक्षपदी बाळा राऊत यांची निवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेर्ले या गावचे रहिवासी व शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते बाळा राऊत यांची नुकतीच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या खारेपाटण विभागिय अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांच्या शुभहस्ते नुकतेच त्यांना खारेपाटण विभाग अध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले असून यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,महीला जिल्हा प्रमुख नीलम पालव, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत,कणकवली विधानसभा संपर्क प्रमुख अतुल रावराणे,शिवसेना कार्यकर्ते मधुकर वळंजू,आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

बाळा राऊत हे खारेपाटण पासून जवळ असलेल्या बेर्ले या गावचे सुपुत्र असून या गावचे सरपंच पद देखील त्यांनी भूषविलेले आहे.याबरोबरच सहकार,सामाजिक व राजकीय शेत्रात उत्तम कार्य आहे. तसेच उद्धव बाळासहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे ते सक्रिय कार्यकर्ते आहे.या सर्व बाबीची दखल घेऊन शिवसेना पक्षाने त्यांना पक्ष संघटना वाढीच्या दृष्टीने खारेपाटण विभागीय अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

error: Content is protected !!