आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचा कु. सुहास र्‍हायकर याला सुवर्ण पदक

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्रथम वर्ष कला शाखेचा विद्यार्थी कु. सुहास मारुती र्‍हायकर याने  प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पदक पटकावले आहे .

मुंबई विद्यापीठ आयोजित ॲथलेटिक्स  स्पर्धा क्रीडा संकुल, मुंबई विद्यापीठ येथे दिनांक १९ ऑक्टोबर २०२४ रोजी पार पडल्या. यामध्ये आयोजित ५ किमी धावण्याच्या  स्पर्धेतत्याने प्रथम क्रमांक मिळवत सुवर्ण पदक जिकंले आहे.त्याला जिमखाना विभाग प्रमुख प्रा.सचिन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय कामगिरी बद्दल संस्था पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!